विमानाच्या इंजिनमध्ये जिवंत कोंबडी का टाकतात? कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
अनेकदा आपण ऐकतो की विमान अपघाताच्या मागे पक्षी धडकण्याचे कारण असते. विशेषतः उड्डाण करताना किंवा लँडिंग दरम्यान पक्षी विमानाच्या इंजिनवर आदळू शकतात. हे ऐकायला जरी साधं वाटत असलं तरी यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.
विमान हवेत असताना त्याचा वेग 350 ते 500 किलोमीटर प्रतितास असतो. अशा वेगात जर एखादा छोटा पक्षी देखील विमानाच्या इंजिनला किंवा विंडशील्डला धडकला, तर मोठं नुकसान होऊ शकतं. विंडशील्ड फुटू शकतो, पायलटला इजा होऊ शकते, किंवा इंजिन बंद पडू शकतं. त्यामुळे अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी एक खास चाचणी केली जाते.
ही चाचणी कशी केली जाते?
ही चाचणी ‘बर्ड स्ट्राइक टेस्ट’ या नावाने ओळखली जाते. या चाचणीमध्ये विमानाचे इंजिन, विंडशील्ड आणि पंख एका सुरक्षित जागी लावले जातात. नंतर त्यावर पक्ष्याच्या वजनासारखा पदार्थ विमानाच्या उड्डाण गतीने फेकला जातो.
पूर्वी या चाचणीत जिवंत कोंबड्यांचा वापर केला जात असे. मात्र, आता ही पद्धत अनेक देशांत बंद झाली आहे. आजकाल यासाठी मेलेली कोंबडी, जिलेटिनचे गोळे किंवा कृत्रिम पक्ष्यांचा वापर केला जातो. या चाचणीचा उद्देश असा असतो की पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाच्या कोणत्या भागाला कितपत नुकसान होते हे समजून घेणे.
नुकसान किती आणि कुठे झाले हे तपासले जाते
चाचणीदरम्यान कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक क्षणाची नोंद केली जाते. मग इंजिनिअर्स आणि तज्ञ पाहतात की ब्लेड तुटले का, विंडशील्डला तडे गेले का, किंवा पंखांना काही इजा झाली का. जर विमान सुरक्षित असल्याचे आढळले, तरच त्याला उड्डाणासाठी परवानगी दिली जाते.
विमान सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे ‘बर्ड स्ट्राइक टेस्ट’ ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. ही चाचणी पक्ष्यांमुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांना टाळण्यासाठी केली जाते. आजच्या आधुनिक काळात जिवंत प्राण्यांचा वापर न करता ही चाचणी अधिक सुरक्षित आणि नैतिक पद्धतीने घेतली जाते.