मोफत मिळणार पत्र्याचे स्टॉल – अर्ज प्रक्रिया सुरू! गटई कामगार योजना 2025

मोफत मिळणार पत्र्याचे स्टॉल – अर्ज प्रक्रिया सुरू! गटई कामगार योजना 2025

सामाजिक न्याय विभागामार्फत गटई कामगार योजना 2025 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी १००% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल दिले जाणार आहेत. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे व आर्थिक सक्षमीकरण व्हावे, या हेतूने ही योजना खास करून राबवली जाते.

👉 गटई स्टॉल योजना अर्ज PDF डाउनलोड

महत्वाचे वैशिष्ट्ये

  • योजना पूर्णपणे अनुदानाधारित आहे (१००% अनुदान).
  • दरवर्षी ही योजना राबवली जाते; यंदाही अर्ज सुरू झाले आहेत.
  • लाभार्थ्यांची निवड समाज कल्याण विभाग ठरवलेल्या लक्ष्यांनुसार केली जाते.

अर्ज कसा करायचा?

  • अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे.
  • अर्जाचा नमुना संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.
  • इच्छुकांनी अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात सादर करावा.
  • या लेखाच्या शेवटी अर्जाचा PDF फॉर्म डाउनलोड लिंक दिली आहे.

गटई स्टॉल योजना अर्ज PDF डाउनलोड

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. जातीचा दाखला (तहसीलदार किंवा समकक्ष अधिकाऱ्यांकडून)
  2. जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
  3. राशन कार्ड झेरॉक्स
  4. भाडे करार/ भाडेची पावती (स्टॉल लावायच्या जागेची)
  5. गटई व्यवसायाचा पुरावा (फोटो किंवा कोणताही मान्य दाखला)

पात्रता अटी

  • फक्त अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील अर्जदार
  • वय: १८ ते ५० वर्षे
  • रहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्रातील) आवश्यक
  • व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक
  • वार्षिक उत्पन्न मर्यादा:
    • ग्रामीण भाग: ₹98,000
    • शहरी भाग: ₹1,20,000

योजनेतून मिळणारे अनुदान

रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करण्यासाठी पत्र्याचे स्टॉल १००% अनुदानावर समाज कल्याण विभागाकडून दिले जातात.

अर्ज PDF डाउनलोड करा

👉 गटई स्टॉल योजना अर्ज PDF डाउनलोड

महत्वाचे
ही योजना केवळ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी आहे. इतर कोणी अर्ज सादर केल्यास तो वैध मानला जाणार नाही.

Leave a Comment