DCPS/NPS लागू असलेल्या ‘या’ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खुशखबर – शासनाचा नवा निर्णय जाहीर

DCPS/NPS लागू असलेल्या ‘या’ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खुशखबर – शासनाचा नवा निर्णय जाहीर

दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS) लागू करण्यात आली आहे. याच योजनेच्या अंतर्गत आता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नवे लाभ:

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील शासन मान्य पदांवर ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी खालीलप्रमाणे फायदे लागू करण्यात आले आहेत.

मुख्य लाभ

  1. सेवेत असताना मृत्यू झाल्यास
    कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान (Death Gratuity) मिळेल.
  2. रुग्णता निवृत्ती (Invalid Retirement)
    अशा कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा निवृत्ती उपदान दिले जाईल.
  3. सेवानिवृत्तीनंतर
    नियमानुसार सेवा निवृत्ती उपदान (Retirement Gratuity) मिळणार.

कायद्यानुसार अमलात येणारे नियम

  • हे सर्व लाभ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ नुसार दिले जातील.
  • केंद्र शासनाच्या नवीन नियमांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आवश्यक प्रक्रिया

  1. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने
    थकबाकी लाभ मिळवण्यासाठी नमुना-३ मध्ये विकल्प भरून विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.
  2. परतावा व समायोजन
    शासनाकडून जमा झालेले NPS चे योगदान, त्यावरील व्याजासह समायोजित केल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन सुरू होईल.
  3. नवीन विकल्प देणे आवश्यक
    वर्तमान व भविष्यातील कर्मचाऱ्यांनी नमुना-२ मध्ये आपला विकल्प विद्यापीठाकडे सादर करावा.
    • सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी – आदेशाच्या दिनांकापासून १ महिन्यात
    • नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी – नेमणुकीपासून ८ दिवसांत
  4. कुटुंबाचा तपशील देणे आवश्यक
    निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नमुना-१ नुसार कुटुंबाचा तपशील द्यावा.

खर्च कोणत्या शिर्षाखाली येईल?

वरील लाभांसाठी लागणारा खर्च ठराविक लेखाशिर्षांतर्गत करण्यात येईल, ज्याचा उल्लेख शासन आदेशात केला आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना DCPS/NPS लागू आहे, त्यांना आता सेवा दरम्यान मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता निवृत्तीनंतरही जुनी निवृत्तीवेतन नियमांप्रमाणे फायदे मिळणार आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment