कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना आनंदाची बातमी! महागाई भत्ता वाढीची आकडेवारी जाहीर!

कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना आनंदाची बातमी! महागाई भत्ता वाढीची आकडेवारी जाहीर!

महागाई भत्ता (DA) वाढणार?

केंद्र सरकारने जानेवारी २०२५ मध्ये महागाई भत्त्यात २% वाढ करून तो ५५% केला होता. आता पुन्हा १ जुलै २०२५ पासून डीए/डीआर (Dearness Relief) वाढवला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या मिळालेल्या आकडेवारीनुसार, यावेळी २ ते ३ टक्के वाढ होऊ शकते. मात्र, अंतिम निर्णय मे आणि जून महिन्याच्या महागाई निर्देशांकानंतरच होईल.

येथे पहा सविस्तर माहिती

ही वाढ शेवटची का असेल?

सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे, ज्याच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील. त्यामुळे जुलै २०२५ मधील ही डीए वाढ ७ व्या वेतन आयोगाची शेवटची वाढ ठरू शकते.

महागाई भत्ता ठरवण्याच्या पद्धतीवर हरकती

काही कर्मचारी संघटनांनी डीए मोजण्याच्या पद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते

  • दर तीन महिन्यांनी डीए ठरवावा – सध्या सहा महिन्यांनी डीए ठरवला जातो, पण महागाईचा तात्काळ फायदा मिळावा म्हणून तो तीन महिन्यांनी ठरवावा.
  • पूर्ण डीए द्यावा – डीएचे गणित पूर्णांकात दिले जाते (जसे ४२.९०% असला तरी ४२% दिला जातो). त्यामुळे पॉइंट-टू-पॉइंट डीए द्यावा.
  • स्वतंत्र महागाई निर्देशांक असावा – सध्याच्या निर्देशांकात अशा वस्तूंचा समावेश आहे ज्या सरकारी कर्मचारी वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र निर्देशांक तयार करावा.

सरकार यावर काय भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होईल. पण सध्या तरी १ जुलैपासून डीए वाढीची शक्यता असल्यामुळे कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment