India Post GDS Result 2025: ग्रामीण डाक सेवक भरतीची चौथी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का पहा!

India Post GDS Result 2025: ग्रामीण डाक सेवक भरतीची चौथी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का पहा!

भारतीय टपाल विभागात फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी तब्बल 21,413 पदांची मोठी भरती करण्यात आली होती. या भरतीत Gramin Dak Sevak (GDS), Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak ही पदे होती.

चौथी लिस्ट येथे पहा

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडली. आता या भरतीची चौथी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी पोस्ट ऑफिसने अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडे किमान 10वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आणि संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक होते.

तिसऱ्या यादीत ज्यांचे नाव आहे, अशा उमेदवारांनी 1 जुलै 2025 पूर्वी कागदपत्र पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी मूळ कागदपत्रांसोबत दोन सेल्फ-अटेस्टेड झेरॉक्स प्रती घेऊन जायच्या आहेत.

यादी कशी पाहाल?


GDS भरतीची निवड यादी पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या:
👉 https://indiapostgdsonline.gov.in

या लिंकवर क्लिक करून “GDS Online Engagement Schedule – January 2025 – Maharashtra Circle – List ।v” हा पर्याय निवडून यादी पाहता येईल.

नाव यादीत असल्यास, तुमच्या नावासमोरील डिव्हिजनल हेडकडे जाऊन वेळेत कागदपत्र पडताळणी करून घ्या.


यादीतील उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व दोन स्व-साक्षांकित छायाप्रतीसह दिलेल्या विभाग प्रमुखाकडे 01 जुलै 2025 पूर्वी हजर राहणे बंधनकारक आहे.

Leave a Comment