राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला [DA] महागाई भत्ता वाढीचा GR येणार
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचा भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
महागाई भत्त्याबाबत नवीन अपडेट
सध्या सातवा वेतन आयोग लागू असलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. केंद्र सरकारने मार्च २०२५ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढवून ५५ टक्के केला आहे, आणि ही वाढ जानेवारीपासून लागू करण्यात आली होती.
या निर्णयाच्या आधारावर महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही भत्त्यात वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही भत्त्यात वाढ केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जून अखेरपर्यंत जीआर येण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भत्तावाढीचा शासन निर्णय (GR) जारी केला जाऊ शकतो. ही वाढ केंद्राच्या धर्तीवरच म्हणजे ५५ टक्के इतकी होण्याची शक्यता आहे.
तथापि, या संदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शासन निर्णय कधी येतो, याकडे सर्वांची उत्सुकता आहे.
पाच महिन्यांचा फरकही मिळणार
नवीन वाढ जानेवारी २०२५ पासून लागू राहणार आहे. त्यामुळे जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जून महिन्याच्या पगारातच ही वाढ आणि फरक दोन्ही समाविष्ट असण्याची शक्यता आहे.