आठवा वेतन आयोग – पे लेव्हल 1 ते 10 पर्यंतचे संभाव्य वेतनस्तर जाणून घ्या! तुमचा पगार किती वाढणार पहा
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी! दिनांक 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. या आयोगामध्ये पे लेव्हल 1 ते 10 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले जाणार आहे. चला तर मग, या नव्या वेतन आयोगात काय बदल होणार आहेत आणि कोणते वेतन स्तर असतील हे पाहूया.
आठव्या वेतन आयोगातील प्रमुख बदल
- कर्मचाऱ्यांचे इन-हँड वेतन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
- वेतनातून होणाऱ्या कपातीचे प्रमाण कमी करण्यात येईल.
- कामकाजातील कौशल्य आणि गुणवत्ता लक्षात घेऊन अतिरिक्त आर्थिक फायदे देण्याची योजना आहे.
नव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन
- वेतन आयोगासाठी मुख्य समिती आणि उप-समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
- कर्मचारी संघटना आणि प्रतिनिधी यांच्याशी सल्लामसलत सुरू आहे.
- मसुदा व कायद्यासंबंधित समित्यांची पण स्थापना झाली आहे.
संभाव्य सुधारित वेतनस्तर (फिटमेंट फॅक्टर 2.50 पट नुसार):
पे लेव्हल | सध्याचे किमान मूळ वेतन (7 वा वेतन आयोग) | संभाव्य किमान मूळ वेतन (8 वा वेतन आयोग) |
---|---|---|
लेव्हल 1 | ₹18,000 | ₹25,000 |
लेव्हल 2 | ₹19,900 | ₹27,000 |
लेव्हल 3 | ₹21,700 | ₹30,000 |
लेव्हल 4 | ₹25,500 | ₹35,000 |
लेव्हल 5 | ₹29,200 | ₹40,000 |
लेव्हल 6 | ₹35,400 | ₹50,000 |
लेव्हल 7 | ₹44,900 | ₹60,000 |
लेव्हल 8 | ₹47,600 | ₹65,000 |
लेव्हल 9 | ₹53,100 | ₹70,000 |
लेव्हल 10 | ₹56,100 | ₹75,000 |
टीप: हे वेतनस्तर कर्मचारी संघटनांनी सुचवलेल्या 2.5 पट फिटमेंट फॅक्टर नुसार अंदाजित आहेत. अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर घेतला जाईल.